
भरवस (ता. अमळनेर) येथे कै. श्रीराम गबाजीराव सोनवणे माध्यमिक विद्यालयात 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 26 जानेवारी 2025 रविवार रोजी झालेल्या ध्वजवंदन सोहळ्याचे मानकरी संस्थेचे सचिव व मा , मुख्याध्यापक बापुसो श्री. व्ही.एस. सोनवणे होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब प्रा. डॉ. श्री. संजय सोनवणे उपस्थित होते. तसेच ग्रामपंचायत सरपंच, सदस्य व गावातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवली.
ध्वजवंदनानंतर विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून सर्वांचे मन जिंकले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती चव्हाण मॅडम यांनी केले व त्यांना एस डी पाटील यांनी सहकार्य केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयाच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
हा सोहळा उपस्थितांसाठी देशभक्ती आणि संस्कृतीच्या एका संस्मरणीय अनुभवाचा भाग ठरला.